• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

महाराष्ट्रात काकांची गुंजतेय ‘वाचवा हो’ ची आरोळी

by Beed Reporter
July 6, 2023
Reading Time: 1 min read
0
भाजपाचा मुड! पंकजांच्या फेट्यात गुढ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

ठाकरे, पवार, भोसले, मुंडे, तटकरे, निलंगेकर, क्षीरसागर हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले थोरले

काका मला वाचवा हो… ची गुहार पेशवाईमध्ये जी गुंजली ती गुहार आज पावेत पुणे परगण्यात ऐकावयास मिळत आहे. मात्र सह्याद्रीच्या या निधड्या महाराष्ट्रात ‘काका मला वाचवा..’ नव्हे तर काकांना वाचवा अशी आरोळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ऐकावयास मिळत आहे. दशकभराच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा करून सोडणार्‍या ठाकरे, मुंडे, पवार, तटकरे, क्षीरसागर या राजकारणातल्या थोरल्या घरांमध्ये खासकरून ‘काकांना वाचवा’ ची आरोळी उभ्या महाराष्ट्राने ऐकली आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फुटीरतेचे समीकरण अशी नवी ओळख या चार वर्षांच्या कालखंडात पहावयास मिळत असतानाच राजकारणातले भीष्म म्हणून ज्या शरद पवारांकडे पाहितले जाते, त्या शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकीय लढाईची चर्चा होत आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी आणि अमोल कोल्हे यांच्या समवेत राज ठाकरेंची ती मुलाखत आठवते का, या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी राजकीय नेत्यांना कोणते सल्ले द्याल, अशा आशयाचा प्रश्‍न राज ठाकरे यांना केला होता. त्या प्रश्‍नात एकनाथ शिंदे, अजित पवार, आदित्य ठाकरे यांचा उपप्रश्‍न होता. अजित पवारांच्या प्रश्‍नावर राज ठाकरेंनी अजित पवार हे बाहेर इतकं लक्ष देतात, पण त्यांनी आपल्या काकांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला ठाकरेंनी दिला होता. त्यावर अजित पवार यांनी ‘तुमच्या प्रमाणेच मी सुद्धा काकांकडे लक्ष देणार’, असे उत्तर दिले होते. तेव्हाच पवारांच्या घरात ‘वाचवा हो’ ची आरोळी ऐकावयास येणार, असे अंदाज बांधले जात होते. महाराष्ट्राला काका-पुतण्याची राजकीय लढाई नवी नाही. राजकीय इच्छाशक्ती असलेल्या राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट खुर्चीची अभिलाषा असते. ती खुर्ची मिळावी यासाठी तो प्रयत्नांची परिकाष्ठा करीत असतो. इथं पुतण्यापेक्षा रक्ताच्या नात्याला खुर्ची मिळावी यासाठी काकांची व्यूहरचना असते. याचे अनेक उदाहरण महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये पहायला मिळाले. अत्यंत संघर्ष आणि आक्रमकतेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मोठी केली. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पान हलत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपला वारसदार हा आपला पुत्र असावा, हे गणित ठाकरेंनी मनामध्ये गिरवून ठेवलं. बालपणापासून त्यांच्या सोबत असलेले, भाषणातली आक्रमकता आणि शिवसेनाप्रमुखांच्या अंगातले व्यंगचित्राचे गुण अंगीकारणारे राज ठाकरे हे पुतणे असल्याने त्यांना राजकीय वारसा हक्कापासून दूर ठेवले. त्यामुळे गेल्या दशकभरापूर्वी बाळासाहेबांच्या हयातीत राज ठाकरे दूर झाले. त्यांनी नवा पक्ष काढला. आज त्याच शिवसेनेत मोठी फूट पहायला मिळाली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाचे म्हणजेच उदयनराजे, अभयसिंहराजे भोसले या काका-पुतण्याच्या वादालाही महाराष्ट्राने अनुभवले. या दोघांमधला वाद उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. इ.स. 1989 पासून हा राजकीय वाद पहावयास मिळत असून दोघेही वेगवेगळ्या पक्षामध्ये दिसून येत आहेत. तिकडे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अवदूत तटकरे या काका-पुतण्यांचा वादही तेवढाच चर्चीत आहे. इकडे बीड जिल्ह्यात काका-पुतण्यांची राजकीय लढाई गेल्या दशकभराच्या कालखंडात उभ्या महाराष्ट्राने पाहिली.
भाजपाचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्यातही तेच झाले जे शिवसेनाप्रमुख आणि राज ठाकरे यांच्यात झाले. लहनपणापासून धनंजय मुंडे हे स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या सोबत असायचे. मात्र ऐनवेळी गोपीनाथरावांनी विधानसभेची उमेदवारी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना दिली आणि इथेच स्व. मुंडे व धनंजय यांच्यात ठिणगी पडली. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. पुढे या दोघांमधला संघर्ष चांगलाच टोकाला गेला. मुंडे यांच्या घरातला काका-पुतण्यांचा वाद आणि वेगळे झालेल्या घरावरील चर्चा बंद होते ना होते तोच बीड जिल्ह्याच्या राजकारणात थोरले घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्व. केशरकाकु यांच्या घरामध्ये काका-पुतण्याचा वाद उफळला. ज्या घरात तीन वेळेस खासदारकी आली, ज्या घरामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या माध्यमातून अनेक वेळा मंत्रिपदे आले त्या घरात जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत राहून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उभा जिल्हा जयदत्त क्षीरसागरांचा वारस पहात असताना ऐनवेळी जयदत्त क्षीरसागरांचे पारडे त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे झुकले आणि गेल्या पाच वर्षांपूर्वी इथेही काका-पुतण्यात वाद झाले. थेट काकांविरोधात विधानसभा निवडणूक लढून संदीप क्षीरसागरांनी जयदत्त क्षीरसागरांना चितपट केले. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकीय परिघात काकांवर पुतणे सातत्याने भारी पठरले. तिकडे अशोक पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातही 2014 साली वाद झाला. पुतण्याने काकाचा 21 हजार मतांनी पराभव केला. राज्याच्या राजकारणात ठाकरे, पवार, भोसले, निंगेकर, क्षीरसागर, मुंडे, तटकरे हे घराणे दबदबा निर्माण करून सोडणारे आहेत मात्र या मातब्बर घरांमध्ये मातब्बर काकांना वाचवा हो ची आरोळी द्यावयास पुतण्यांनी भाग पाडले.

Previous Post

तलवार घेऊन फिरणार्‍या एकास पोलिसांनी केली अटक

Next Post

“अजित पवारांना पक्षावर दावा करता येणार नाही, कारण…”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
“अजित पवारांना पक्षावर दावा करता येणार नाही, कारण…”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

“अजित पवारांना पक्षावर दावा करता येणार नाही, कारण…”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?