जैन आचार्य नंदीजी यांच्या हत्येचा जाहीर निषेध
बीड (रिपोर्टर): जैन आचार्य श्री 108 कामकुमार नंदीजी मुनीराज यांच्या हत्येचा जैन समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला असून या प्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्व जैन समाज सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी जैन आचार्य कामकुमार नंदीजी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोषींविरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज बीड शहरातील जैन समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये सर्व जैन समाज सहभागी झाले होते. महिलांचीही मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान जैन आचार्य नंदीजी मुनिराज यांच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.