बीड (रिपोर्टर): जिजाऊ मल्टिस्टेटमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून बबन शिंदे फरार झाले आहेत. अध्यक्ष अनिता शिंदे या काल पोलिसांना शरण गेल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताच आर्थिक गुन्हे शाखा, शिवाजीनगर अशा दोन पथकांनी त्यांच्या घरावर छापे मारले. मात्र यामध्ये काहीच मिळून आले नाही.
बीड शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या जिजाऊ मल्टिस्टेटमधील कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. बीड पाठोपाठ नेकनूरमध्येही या बँकेचा घोटाळा उघडकीस आला आहे. नेकनूर ठाण्यातही ठेवीदारांनी तक्रारी दिल्या मात्र अद्याप तिथे गुन्हा दाखल झालेला नाही. बीडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे पोलिसांना शरण आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताच बँकेतील पैशातून त्यांनी कोठे काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का यासह तपासात लागणार्या विविध कागदपत्रांसाठी घरावर छापा टाकला. मात्र यामध्ये पोलिसांना काहीच औळून आले नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे हरीभाऊ खाडे यांनी सांगितले.