Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमअतिक्रमण विरोधात तरूणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगार रॉकेल ओतले

अतिक्रमण विरोधात तरूणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगार रॉकेल ओतले

ग्रा.पं.सदस्याने मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केले
बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील हनुमान मंदिराच्या जागेवर ग्रा.पं.सदस्यानेच अतिक्रमण करून किराणा दुकान थाटले. सदरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी एका तरूणाने अनेक वेळा प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासन अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याने आज तरूणाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येवून कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी या तरूणास ताब्यात घेवून अटक केली आहे. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.


माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील राजपुतपुरा हनुमान मंदिराच्या जागेवर ग्रा.पं.सदस्य रमेश प्रदिप पाटील याने अतिक्रमण करून त्याठिकाणी स्वत:ची किराणा दुकान थाटली. हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी विलास कैलास मांदड या तरूणाने केली. माजलगाव तहसील, ग्रामपंचायत तालखेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन देवूनही अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते. अतिक्रमण हटवले जात नसल्याने विलास मांदड याने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तो पुर्णत: रॉकेलने भिजलेला होता. सदरील हा प्रकार तेथील चौकीतील पोलीस कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व या तरूणाला ताब्यात घेवून शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!