बीड (रिपोर्टर)ः- दिनांक सात जुलै 2023 रोजी ग्रामविकास व शलेय शिक्षण विभागाने एका आदेशान्वये शिक्षकांना रुपये 20,000 मानधनावर देण्याचे आदेश काढले आहेत. ही डीएड बीएड विद्यार्थ्यांची कुचंबना आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन आहे याउपर मधुमेह-बीपी आदी आजाराने ते ग्रस्त आहेत त्यामुळे त्यांना काम करणे जिकीरीचे होईल. आज हजारो डीएड -बीएड विद्यार्थी बेकार आहेत त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे ह्याच रकमेवर त्यांना आदेश दिल्यास त्यांची बेकारी हटेल त्यामुळे शासनाने सात जुलै 23 चा आदेशात सुधारणा करून डीएड बीएड विद्यार्थ्यांना बंधपत्र देऊन आदेश द्यावेत असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत, मराठवाडा विभाग प्रमुख रामदास मगरे, जिल्हाध्यक्ष सुमेध जोगदंड आदिनी आवाहन केले आहे.