बीड (रिपोर्टर): छेडछाडीला कंटाळून एका मुलीने बीड शहरामध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याने आरोपीच्या अटकेसाठी भवनावाडीचे नागरीक जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
अमोल हरीदास जगताप याच्या छळाला कंटाळून 11-6-2023 रोजी बीड शहरामध्ये एका मुलीने आत्महत्या केली होती. या प्रकररी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही. आरोपीच्या अटकेसाठी भवानवाडीचे नागरीक जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या वेळी रेणाजी भोसलेंसह आदी नागरीकांचा सहभाग असून त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.