Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमहमे को बस रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके, ...

हमे को बस रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके, कथित करुणा शर्माच्या ऑडिओ क्लिपने सत्य बाहेर

करुणा शर्माला दबाव टाकून धनंजय मुंडेंकडून काढायचे आहेत पैसे
परळी (रिपोर्टर)- उच्च न्यायालयातील धनंजय मुंडे यांच्या वकिल श्रीमती सुषमा सिंह यांच्या प्रसिध्दी बाबत करुणा शर्मा यांना घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या नोटीसीचा संदर्भ देत कथित करुणा शर्मा यांची त्यांच्या कर्मचारी/हितचिंतक/सल्लागाराशी बोलणारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, या क्लिप मध्ये करुणा शर्मा या उच्च न्यायालयाचा अवमान होण्याबाबतची मिळालेली नोटीस सत्य आहे व आपल्याला जाणीव असून, हे आपल्या फायद्याचेच आहे. आपल्याला फक्त ’रायता’ म्हणजेच गोंधळ पसरवायचा आहे आणि आपला मूळ उद्देश दबाव टाकून पैसे उकळण्याचा आहे असे बोलताना स्पष्ट ऐकायला येत आहे.


या ऑडिओ क्लिप मध्ये करुणा शर्मा या आपल्या हितचिंतकाशी वार्तालाप करत असून, यामध्ये समोरील व्यक्ती त्यांना सांगतो की, तुमने सामनेसे आई नोटीस और व्हायरल मेसेज देखा क्या? उसमे उनकी वकील सुषमा सिंह ने लंबा लिखा है की उसके बारे मे तुम कुछ भी पब्लिश करते हो…. (पुढील संवादात समोरील व्यक्तीने मराठी भाषेतील यासंबंधी काही प्रसार माध्यमात छापून आलेला मजकूर वाचून दाखवला आहे) पुढे तो म्हणतो की, अगर कुछ बोलती हो तो वो कंटेम्ट ऑफ कोर्ट होगा; त्यावर करुणा शर्मा म्हणतात, कंटेम्ट होगा क्या? हां एक सो एक टक्का कंटेम्ट होगा, इसलीये तुम जो भी बोलोगी सोच समझकर बोलणा!
त्यानंतर करुणा शर्मा सांगतात की, अरे इसे मेरी वॉल से डाल दो (माझ्या अकाउंट वरून हे आपल्या पद्धतीने पोस्ट करा!) ये अपने लिये फायदा हो गया? पुछो कैसे? त्यावर समोरचा म्हणतो, कैसे? तर करुणा शर्मा म्हणतात, अरे मै जाऊंगी, मै मंदिर जाऊंगी और फिर रायता फैला दुंगी! (गोंधळ घालून टाकीन) पुढे करुणा शर्मा म्हणतात, अरे अपनेको क्या बस पैसे निकालने है, प्रेशर बनाके| तू भी बोल देना मै पत्रकार हूँ! त्यानंतर संभाषण बंद होते! या बाईंचा उद्देश केवळ ब्लॅकमेल करण्याचा आहे, हे धनंजय मुंडे सुरुवातीपासून सांगत आलेत, त्यांनी केलेल्या खुलाशात व कोर्टात केलेल्या याचिकेत देखील याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर आज समोर आलेल्या या क्लिप मध्ये करुणा शर्मा या केवळ पैसे उकळण्यासाठी हे सर्व स्टंट करत आहेत, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!