बीडमध्ये अनिल जगतापांंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर
बीड (रिपोर्टर): भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेद करत जोडे मारो आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. बीड शिवसेना जिल्हाप्रमुख मा अनिलदादा जगताप यांच्या मार्गदर्शना नेतृत्वाखली दि. 18 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड येथे शिवसेना महिला आघाडी अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन बेटी को भाजप से बचाव या नार्याची घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले. एवढेच नाहीतर भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या फोटो बॅनरवर लाथा बुक्या मारत बॅनर पायदळी तुडवून बॅनर जाळले आहे.
नैतिकतेच्या गप्पा मारणार्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बीड शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणार्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आली असल्याचे मत यावेळी केले. किरीट सोमय्याला फाशी सारखी कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा भाजपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस कधी कारवाई करणार आहेत असा प्रश्न माध्यमांसमोर बीड शिवसेनाच्या पदाधिकार्यांनी मांडला आहे. शिवसेनेच्या जोडे मारो या आंदोलनासाठी शिवसेना सर्व जिल्हा संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख आणि शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली.
शिवसैनकांचा ’बेटी को भाजप से बचाव’ नारा
बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा देत भाजप राज्यभरात आणि देशभरात आपली नैतिक मूल्य किती उच्च दर्जाची आहेत हे सिद्ध करते तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा अश्लील व्हिडिओ माध्यमांसमोर येतो. यावरून भाजपचे ढोंग आता उघडे पडले असून भाजपाचे बेटी बचाओ हे धोरण सपशेल तकलादू आणि खोट्या स्वरूपाचे आहे त्यामुळे बीडमध्ये किरीट सोमय्या विरोधात संतप्त शिवसैनिकांनी केलेल्या जोडे मारो आंदोलनात बेटी को भाजप से बचाव हा नारा दिला.
धारूरमध्येही आंदोलन
किल्ले धारूर : शिवसेना तालुकाप्रमुख नागेश शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नागेश भाउ शिनगारे बोलताना म्हणाले की नेहमी मीडियाच्या समोर येऊन कोणावर हि बिन बुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या किरीट सोमयाचे काळे धंदे उजेडात आले असून अशा या किरीट सोमय्या सारख्या कलंकित नालायक माणसाचा शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत असून हा तोतरा सतत अर्ध्या जीबी च्या साह्याने मातोश्री विषयी गरळ ओखत असतो दुसर्यांना ज्ञान शिकवत असतो दुसर्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत असतो मात्र त्याच्या बुडाखाली अंधार असून त्याचा अंधार महाराष्ट्रातील मीडियाने उजेडात आणला आहे अशा या नालायक बेशरम असलेल्या किरीट सोमयाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यत येत असून यापुढे किरीट सोमय्या यांनी मातोश्री विषयी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी आप शब्द वापरल्यास त्यांची अर्धी जिभ बाहेर काढू असा इशारा मी शिवसैनिकाच्या वतीने देतो असे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किल्ले धारूर तालुकाप्रमुख नागेश शिनगारे म्हणाले यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सराफ, शिवसेना धारूर तालुका संघटक बंडु सावंत, .सुनील भामरे. ,अरुण गाडे ,बलभीम मुंडे,शेख शाखेर .बाबा तीबोले .अमोल शिरसाट. चंद्रसेन तिडके. धनंजय शिनगारे .शरद उबाळे. राम बारस्कर .सुनील गवळी. दयानंद आदमाने. कृष्णा कांदे. सुनील कोमटवार . नितीन राऊत .अमर बसवर. विशाल साठे .राम वराडे. फुलचंद शिनगारे .गणेश बसवर. यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते