धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीत रेकॉर्डब्रेक घरकुलांना मंजुरी, 371 पूर्ण तर 600 घरकुलांना बांधकाम कार्यारंभ आदेश मिळणार
परळी (रिपोर्टर)ःराज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात व गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैद्यनाथ नगर पालिकेकडून मंजूर करण्यात आलेल्या 100 घरकुलांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे वितरण आज ज्येष्ठ नेते तथा न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भाजपच्या भारतीताई कुलकर्णी, शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष वैजनाथ माने, चंदूलाल बियाणी, दीपकनाना देशमुख यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैद्यनाथ नगर पालिकेअंतर्गत रमाई आवास योजनेतून आतापर्यंत तब्बल 1082 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक मानली जात आहे. यांपैकी 371 घरकुले बांधून पूर्ण देखील झाली आहेत, तर उर्वरित पैकी आणखी 600 घरकुलांना कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक झोपडपट्ट्या असलेल्या परळी शहरात धनंजय मुंडे व वाल्मिक अण्णा कराड यांनी विशेष प्रयत्न करून घरकुलांसाठी जागेचे प्रश्नही सोडवले आहेत.आज नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 100 घरकुलांच्या लाभार्थींना पहिल्या हफत्याच्या 50 हजार रुपये रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले. 31 मार्च 2023 रोजी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी नगर परिषदेस रमाई आवास योजनेतील घरकुलांच्या कामांसाठी तब्बल 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
दरम्यान परळी नगर परिषद अंतर्गत रमाई आवास योजनेतील लाभार्थींची संख्या 1000 च्या पुढे गेली आहे, रमाईसह इतर सर्व योजनेतील लाभार्थींची संख्या पाहता, धनंजय मुंडे व वाल्मिक अण्णा कराड यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.या कार्यक्रमास गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख वैजनाथ माने, चंदूलाल बियाणी, दिपकनाना देशमुख,रवींद्र परदेशी, दत्ताभाऊ कुलकर्णी, भारतीताई कुलकर्णी, नितीन रोडे, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, रवी मुळे, रामेश्वर महाराज कोकाटे, शकील कच्छी, भारत ताटे, सुरेश नानवटे, धम्मा अवचरे, गणेश सुरवसे, न.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कांबळे, संतोष रोडे, घरकुल विभागप्रमुख शरणम ताटे, मिसाळ आदी उपस्थित होते.