बीड (रिपोर्टर)ः- गांधी नगर परिसरातील नूर कॉलनी येथे काही दिवसापूर्वी पाईपलाईनसाठी कच्चे रस्ते खोदलेले आहे. या खोदकामामुळे आता नागरीकांना त्रास होवू लागला. चिखलात गाड्या फसू लागल्या. रिक्षा पलटी होवू लागले. आज सकाळी एक अॅपे रिक्षा पलटी झाल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या भागात पक्के रस्ते करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे. नगर पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी.
गांधी नगर भागात वसाहती वाढल्या मात्र नागरी सुविधा नगर पालिकेकडून दिल्या जात नाही. 2011 साली हा परिसर न.प.मध्ये समाविष्ट करण्यात आला. इतके वर्ष होवूनही साधे व्यवस्थीत रस्ते नाही. नूर कॉलनी भागात काही दिवसापूर्वी पाईपलाईन साठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यामुळे आता त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागू लागला. रस्त्यावर चिखलच चिखल आहे. चिखलात गाड्या फसू लागला. आज सकाळी एक अॅपे रिक्षा पलटी झाला. या भागातील रस्ते बाबत नगर पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी या भागातील नागरीकांकडून केली जावू लागली. निवडणुकीच्या आधि रस्त्याचे काम न झाल्यास या भागातील नागरीक रस्त्यावर उतरणार आहे.