जिल्ह्यासाठी 1 लाख 53 हजार घरकुलांचे उद्दिष्ट
बीड (रिपोर्टर): केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र ओबीसी पंतप्रधान घरकुल योजना सुरू केली असून बीड जिल्ह्यासाठी मार्च 2024 पर्यंत 1 लाख 53 हजार घरकुले या योजनेतून मंजूर करण्यात येणार आहेत.
सन 2011 आणि दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल ड योजनेअंतर्गत जालेल्या सर्वेतून या घरकुलांसाठी ही नावे निश्चित करावयाची आहेत. तालुका पातळीवर उपलब्ध असलेल्या यादीतून ओबीसी प्रवर्गातील लोकांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. पंचायत समितीला घरकुल योजनेसाठी जे अभियंता कार्यरत आहेत त्या अभियंत्यांनी गाव पातळीवर प्रत्यक्ष भेट देऊन ही नावे 24 जुलै 2023 पर्यंत सर्वे करून (पान 7 वर)
निश्चित करावयाची आहेत. यातील मयत आणि गाव सोडून गेलेले लाभार्थी वगळण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जनरल पंतप्रधान घरकुल योजनेसोबतच नव्याने सुरू होत असलेल्या ओबीसी पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य बेघर असलेल्या लोकांना या घरकुलाचा लाभ होणार आहे.