Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराई तालुक्यात पाच तलाव फुटले अनेक गावात पाणी घुसले; हजारो हेक्टर शेती...

गेवराई तालुक्यात पाच तलाव फुटले अनेक गावात पाणी घुसले; हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त


गेवराई (रिपोर्टर)- गेवराई – गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून या पावसाने तालुक्यातील सर्वच लघु प्रकल्प ओव्हर फ्लवो झाले असून नद्या नाल्याना पूर आल्याने छोटे मोठे तलाव फुटले असून अनेक गावात पाणी घुसल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील मारफळा येथील साठवण तलाव फुटल्याने या तलावाखालील असलेले चोपड्याचीवाडी गाव पुर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे. परिणामी या गावात पाणीच पाणी झाले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराघरात कंबरेऐवढे पाणी असल्याने घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे जातेगाव येथील पाझर तलाव फुटून तलावाखाली असलेले जनावरांचे गोठे वाहून गेली असून जनावरे देखील पाण्यात वाहून गेली आहेत. कामा निमित्त बाहेर गावी गेलेले नागरिक अनेक ठिकाणी गावबाहेरच अडकून राहिले आहेत. तर रुई धानोरा येथील अनेक शेतकर्‍यांचे तुतीचे शेड वाहून गेल्याने या पिकाचे देखील नुकसान झाले आहे.

241468429 1879664648872558 1808331934320317701 n


तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामध्ये रविवारी गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा, शेकटा व खोपटी तांडा येथील तीन तलाव फुटले होते. तर मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील पुन्हा भेंड खुर्द,भेंड बुद्रुक, आम्ला व मारफळा येथील पाझर तलाव फुटले असून मारफळा येथील तलाव फुटल्याने या तलावाखालील चोपड्याचीवाडी पुर्णतः पाण्यात गेली आहे. या गावाला पुर्णपणे पाण्याचा वेढा पडला असून घराघरात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून संसारोपयोगी साहित्य , अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सध्या संपुर्ण गाव पाण्यात गेल्याने येथील नागरीकांची चांगलीच तारांबळबळ उडाली आसुन प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी गावाबाहेर पडले आहेत तर काही नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र जागून काढली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जातेगावच्या दोन्ही बाजूच्या नद्यांना मोठा पुर आल्याने या नदी लगतच्या शेतातील पिकपाण्याखाली गेल्यानं अति नुकसान झाले असून येथील बाबासाहेब भिकारी,काकासाहेब भिकारी, आप्पासाहेब भिकारी यांच्या जनावरांचे गोठे वाहुन गेले यामध्ये दोन गोरे वाहून गेल्याने ते दगावले आहेत. तिकडे गोळेगाव येथील सखाराम काळे या शेतक-यांची बैलगाडी वाहुन गेली त्यात गावकर्‍यांनी शेतकरी व एका बैला वाचवण्यात यश आले आहे. तर बेलगुडवाडी येथील बंधारा फुटल्याने परिसरातील शेती व पिके वाहून गेली आहेत. तसेच रुई शिवारात तुतीची लागवड मोठ्या प्रमाणावर असून जळगाव शिवारातील बळीराम नवले यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आम्ला व धानोरा येथील पाझर तलाव फुटला असून तलावाखालील शेती वाहून गेली आहे. यामध्ये धानोरा येथील शेतकर्‍याच्या तीन शेळ्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे सर्वत्र प्रचंड नुकसान झाले आसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात व घरात पाणी शिरल्याने आर्थिक व संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाल्याने या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!