हल्ला, गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
टाकरवण(रिपोर्टर): शेतीच्या किरकोळ वादातून दोन गटात रक्तरंजी राडा झाला. यावेळी एका गटाने दुसर्या गटावर लोखंडी रॉड, काठ्याने हल्ला चढवला. यामध्ये एकाच गटाचे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तलवाड्यात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी तलवाड्यापासून जवळ असलेल्या देवीतांडा येथे घडली.
याबाबद अधिक माहिती अशी की, तलवाड्याजवळ देवीतांडा येथील दोन भाऊ व पुतण्या हे तीन लोक शेतात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यांच्याशेजारील अंकुश खवाटे,
गंगा खवाटे व इतर तीन चार लोकांनी मिळून शेतीच्या बांधाचे कारण करून देवितांडा येथील डिंगाबर मिठू राठोड, महादेव मिठू राठोड व कैलास देविदास राठोड यांना लोखंडी रॉड, लाखडी दांड्याने गंभीर मारहाण केली. यामध्ये डिंगाबर राठोड यांच्या डोक्यात जास्त मार लागल्यामुळे प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी तलवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉ.काकड यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. जिल्ह रुग्णालयात तीनही जखमींवर उपचार सुरु आहेत.