बीड (रिपोर्टर) दरवर्षी वादळी वार्यासह पाऊस पडत असतो. या पावसात विज पडून मरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. दोन वर्षात बीड जिल्ह्यामध्ये विज पडून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
शेतामध्ये काम करत असताना किंवा झाडाखाली थांबल्यानंतर विज पडून मरणार्यांची संख्या वाढू लागली. पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी विजा पडत असतात. गेल्या दोन वर्षामध्ये बीड जिल्ह्यात विज पडून 23 जणांचा मृत्यू झाला. विज पडू नये याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असे आवाहन दरवर्षी आपत्ती विभागाकडून केले जात असते.
पुरात वाहून गेल्याने
29 जणांचा मृत्यू
गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसात नद्या नाल्यांना महापूरही आले होते. पुरामध्ये 29 जणांचा वाहून जावून मृत्यू झाला. तर भिंत पडून तीन जण दगावले. इतर आपत्तीमध्ये एका जणाचा मृत्यू झाला.
काय काळजी घ्यावी?
विज चमकत असताना घराबाहेर पडू नये, घरातील पृष्ट भाग आणि भिंती कोरड्या राहतील याची दक्षता घ्यावी, बाहेर असताना उभे न राहता जमिनीवर बसावे, आडवे व्हावे, झाडाखाली उभे राहू नये किंवा बसू नये, केंद्र सरकारने तयार केलेले दामिनी हे मोबाईल अॅप डाऊनलोड केल्यास विजांबाबतची पूर्वकल्पना मिळू शकते.