Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeराजकारणमोठी बातमी - शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मोठी बातमी – शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई (रिपोर्टर) माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

भाजपाचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच भाजपाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला. माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी गेल्या आठवड्यात भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हाच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. आज राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!