गेवराईच्या दोन गुडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई
बीड (रिपोर्टर):गेवराई तालुक्यासह तलवाडा पोलिस हद्दीत दहशद निर्माण करत वारंवार गुन्हे करणार्या दोन वाळू माफियांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोघांची आज सकाळी हर्सुल काराग्रहात रवानगी केली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दहशद निर्माण कराण्यांवर अशा कारवाया वारंवार केल्या जातील असे पोलिस अधिक्षक म्हणाले.
तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशद निर्मान करणार्यांवर पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दि. 13 जुलै 2023 व 14 जुलै 2023 रोजी अनुक्रमे गोरख सदाशिव काळे वय 31 वर्षे, व लखन तुकाराम काळे (वय 38 वर्षे) (दोन्ही रा. राजापुर ता. गेवराई जि. बीड) यांचे विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. गोरख सदाशिव काळे या स्थानबध्द इसमा विरुध्द पोलीस ठाणे तलवडा येथे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दंगा करणे, रस्ता आडविणे, जबरी चोरी करणे, वाळु गौण खनिज याची चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, वगैरे अशा स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 06 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तसेच लखन तुकाराम काळे या स्थानबध्द इसमाविरुध्द एकुण 5 गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल आहेत. दोन आरोपीवर प्रतिबंधात्मक करवाइ करण्यात आली होती मात्र त्या कारवाईला आरोपींनी न जुमानता वारंवार गुन्हे करत राहीले. तलवडा हद्दीत व गेवराई तालुक्यात दहशत निर्माण करत असल्यामुळे लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. ते शस्त्रासह फिरतात व सर्वसामान्य लोकांना व शेतकर्यांना त्रास देवून दहशत निर्माण करुन वाळु चोरीचे गुन्हे करत होते. त्यामुळे दोन्ही गुंडांवर कारवाई करत त्यांना हर्सुल कारवाग्रहात स्थानबंध करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविपोअ गेवराई राजगुरु, पो.नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर वाघमोडे, पोउपनि भवर पोह सचिन आलगट, पोअं/ पिंपळे सर्व पो स्टे तलवडा तसेच स्थागुशा बीड येथील पोउपनि खटावकर, पोह अभिमन्यु औताडे, सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, विकास वाघमारे, घोडके, चालक कदम यांनी केलेली आहे.