Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनासणोत्सवात कोरोनाचा धोका, गर्दी टाळा, कोरोनाला पळवा ,जिल्ह्यात 48 बाधित, आष्टीत सर्वाधिक...

सणोत्सवात कोरोनाचा धोका, गर्दी टाळा, कोरोनाला पळवा ,जिल्ह्यात 48 बाधित, आष्टीत सर्वाधिक 31

बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसताना सणोत्सवात बाजार पेठांसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असल्याने या काळात कोरोनाचा संभाव्य धोका वर्तवण्यात येत असून जिल्ह्यात काल 2 हजार 35 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या असता त्यामध्ये 48 कोरोना बाधीत आढळून आले. यात सर्वाधिक कोरोना बाधित हे आष्टी तालुक्यात आढळून आले आहेत. 4 तालुक्यात एकही कोरोना बाधित अढळून आला नाही. या स्थितीत जनतेने शासनाच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात दिसून येत आहे, मात्र आष्टी तालुक्यात आजही कोरोनाचा आकडा हा मोठा आहे. काल जिल्ह्यातून 2 हजार 35 संशयितांची तपासणी करण्यात आली असता 48 जण यात बाधीत आले असून यामध्ये बीड 8, केज 3, माजलगाव 2, परळी 1, पाटोदा 1, वडवणी 2 तर आष्टीत सर्वाधिक 31 रुग्ण मिळून आले आहेत. सध्या सणोत्सवाचे दिवस आहेत. या परिस्थितीत बाजार पेठांसह गावागावात वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्ससह विना मास्क मोठ्या प्रमाणावर लोक गर्दीच्या ठिकाणी येत असल्याने कोरोना वाढीचा संभाव्य धोका असल्याचे यावरून दिसते. त्यामुळे सणोत्सव साजरा करताना लोकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!