हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो? तात्काळ अटक करा; पृथ्वीराज आक्रमक
मुंबई (रिपोर्टर): संभाजी भिडे नामक व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत निंदाजनक असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या गृहस्थाला ताबडतोब अटक करा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.महात्मा गांधी यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार होते, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण आज विधानसभेत आक्रमक झाले व सरकारने तातडीने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी विधानसभेत केली.
पृथ्वीराज चव्हाण विधानभेत म्हणाले, संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नालस्ती केली. त्यांच्याबद्दल अतिशय निंदाजनक वक्तव्ये केली. संभाजी भिडे यांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार आहे. अशा व्यक्तीला सरकारने ताबडतोब अटक करावी.
ृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे हे गृहस्थ अनेक वर्षांपासून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात दंगे घडवण्याचा प्रयत्न संभाजी भिडे करत आहे. आज राष्ट्रपित्याबद्दल अतिशय निंदाजनक वक्तव्ये संभाजी भिडे यांनी केली. हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो? संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याचे काही पडसाद उमटले तर जबाबदार कोण? त्यामुळे शासनाने याची तातडीने दखल घेऊन संभाजी भिडेंना खझउ 153 अंतर्गत अटक करावी.पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत सभागृहाला जी काही माहिती दिली आहे, त्याची नोंद शासनाने घेतली आहे. संभाजी भिडे यांचे वक्तव्य तपासून योग्य ती कारवाई केली जाईल.