Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमदहा हजाराची लाच घेणार्‍या सहायक निबंधकास ३ वर्षाची शिक्षा बीडच्या न्यायालयाचा निकाल

दहा हजाराची लाच घेणार्‍या सहायक निबंधकास ३ वर्षाची शिक्षा बीडच्या न्यायालयाचा निकाल


बीड (रिपोर्टर)- पाटोदा येथील इंदिरा रॉकेल वितरण व पुरवठा सहकारी संस्थेच्या अहवालासंदर्भात सहायक निबंधकाने १० हजाराची लाच घेतली होती. लाच घेताना त्याला औरंगाबादच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. हे प्रकरर बीड येथील न्यायालयात सुरू होते. न्यायालयाने लाचखोर अधिकार्‍याला दोषी ठरवून तीन वर्षाची शिक्षा सुनावली.


पाटोदा येथील इंदिरा रॉकेल वितरण व पुरवठा सहकारी संस्थेने २०११ साली संस्थेचा लेखापरिक्षण अहवाल दाखल न केल्याने त्यांना दि. २३ सप्टेंबर २०११ रोजी संस्थेचा कारभार गुंडाळण्याबाबत अंतरिम आदेश सहायक निबंधक सुनिल वाघमारे यांनी दिला होता. लेखापरिक्षण अहवाल दाखल केल्यानंतर अंतरिम आदेश रद्द करण्याची शिफारस करण्याकरिता सुनिल वाघमारे यांनी या संस्थेचे चेअरमन शेख इसाक व शेख महेबूब यांना १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत शेख इसाक यांनी लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालय, बीड येथे ११ एप्रिल २०१२ रोजी तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा होऊन आरोपीविरुद्ध त्याच दिवशी औरंगाबाद येथील पोलीस उपअधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक वानखेडे यांनी सापळा रचून दहा हजार रुपये घेताना जालना रोडवरील निबंधक सहकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र त्यावेळचे उपअधीक्षक शिनगाडे यांनी दाखल केले होते. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. प्रमुख सत्र न्यायाधीश महाजन यांच्यासमोर प्रकरणातील युक्तीवाद होऊन आरोपी सुनिल वाघमारे यास लाचप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यात वाघमारे यास कलम ७ खाली एक वर्ष सक्तमजुरी व हजार रुपये दंड, कलम १३ (१) (ड) सह १३ (२) ला.लु.प्र.का. खाली ३ वर्षे सक्त मजुरी व हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ऍड. मिलिंद वाघमारे यांनी बाजु मांडली. लाचलूचपत कार्यालय बीडतर्फे पैरवी नेहरकर यांनी केली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!