वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहराचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संकेत मोबाईल शाँपी अज्ञात चोरट्यांनी फोडली असुन जवळपास 5 लाखाची अक्सेसीरीज वस्तू लंपास केल्याची माहिती देण्यात आली असून चोरटे सीसीटिव्ही कँमेरात कैद झाले आहेत.तर सदरील व्हिडिओ वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी शहरातील ऐन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाटील यांची संकेत मोबाईल शाँपी होती. या दुकानावरील पत्रे उचकून अज्ञात चोरट्यानी आतमध्ये प्रवेश करत मोबाईलच्या अक्सेसीरीज वस्तु जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती खुद्द शाँपीचे मालक पाटील यांनी दिली आहे. तर सदरील अज्ञात चोरटे सीसीटिव्ही कँमेरात कैद झाले असून सदरील सीसीटिव्ही कँमेरातील व्हिडिओ पोलीसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे. तर सदरील घटनेचा पंचानामा वडवणी पोलीसांनी केला आहे. दुपार पर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता तर वडवणीतील पोलीसां समोरच अज्ञात चोरट्यांनी एक आव्हान दिले असल्याचे दिसून येत असुन या आव्हानाला पोलीस रोखणार का ? असा प्रश्न उपस्थित राहत असून या सततच्या घटनेकडे बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.