Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमगेवराई पोलिसांकडून गावठी रिव्हॉल्वरसह दोन जण ताब्यात

गेवराई पोलिसांकडून गावठी रिव्हॉल्वरसह दोन जण ताब्यात

सपोनि साबळे यांच्या डी. बी.पथकाची कारवाई
गेवराई (रिपोर्टर) गुप्त माहितीनुसार विक्रीसाठी आणलेल्या गावठी रिव्हॉल्वर सह दोन आरोपींना गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य एक आरोपी फरार आसून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई सोमवार रोजी रात्री 7 वा. गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनि साबळे यांच्या डी. बी.पथकाने केली आहे.


बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात घेता बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डीबी पथकाची स्थापना केली आसून गेवराई पोलीस ठाण्यात सपोनि साबळे यांच्याकडे या पथकाची धुरा देण्यात आली असून गेल्या दोन महिन्यात या पथकाने अनेक कारवाया करत विविध गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान सोमवार दि.20 रोजी या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गेवराई ठाण्याच्या हद्दीत सायं.7 वा. ढोक वडगाव फाटा येथील साई हॉटेल येथून गावठी रिव्हॉल्वर विक्री करणार्‍या टोळीतील राहुल दादासाहेब सोळसकर (वय 22 वर्ष) रा.गढी, सय्यद अरबाज निजाम (वय- 21 वर्ष) रा.गढी या दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून एक गावठी रिव्हॉल्वर व एक जिवंत कडतुस जप्त करत त्यांच्या विरोधात कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल केला तर यापैकी निष्पन्न असलेला दिपक राधाकिसन पवार रा.रांजनी हा आरोपी फरार असून याचा तपास पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लांजेवार, डीवायएसपी स्वप्नील राठोड, गेवराई ठाण्याचे प्रमुख पो.नि. रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे, पो.हे.कॉ.देशमुख, जायभाये, नागरे, पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने आदींनी केली.

Most Popular

error: Content is protected !!