बीड (रिपोर्टर): बीड वगळता राज्यासह अवघ्या देशात दहाचा ठोकळा चलनात स्वीकारला जात असताना बीडमध्ये मात्र छोट्या व्यापार्यांसह मोठे व्यापारी दहाचा ठोकळा स्वीकारत नसल्याने चिल्लरबाबत अनेक वाद व्यापारी आणि ग्राहकात होताना दिसून येतात. चलन न स्वीकारणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांनी दहाचा ठोकळा स्वीकारावा.
बाजारामध्ये दहा रुपयांच्या नोटा अत्यंत जिर्ण पहावयास मिळत आहेत. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये या जीर्ण नोटांमुळे काही ठिकाणी वादही पहायला मिळाले. जीर्ण नोट खिशातून काढताना अथवा व्यवहारात आणताना ती अनेक वेळा फाटली जाते, अनेकांना दहा रुपयाच्या नोटेतून नुकसानही होते. मात्र असे असतानाही आज पावेत बीड जिल्ह्यात दहाच्या ठोकळा चलनामध्ये स्वीकारला जात नाही. बीड जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यापार्यांनी दहाचा ठोकळा चलनात स्वीकारावा, भारतीय चलन न स्वीकारणे हा कायद्याने गुन्हा आहे.