Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकेजमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार की वेगळं लढणार? नेत्यासह कार्यकर्ते लागले कामाला,...

केजमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार की वेगळं लढणार? नेत्यासह कार्यकर्ते लागले कामाला, वार्डावार्डात होवू लागली चर्चा


केज (रिपोर्टर):- नगर पालिका, नगर पंचायतच्या निवडणूका डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेते आत्तापासून कामाला लागले. वार्डावार्डात निवडणूकीच्या चर्चा रंगू लागल्या. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काही भावी नगरसेवक प्रयत्नाची पराकाष्टा करून लागले. केज नगर पंचायत ही कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पाहता कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी आहे. ही आघाडी केजमध्ये कायम दिसणार की कॉंग्रेस-राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेणार याकडे ही कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे केज हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा कॉंग्रेसपक्षाकडून तिकीट मिळावे याकडे दिसून येत आहे.
प्रभाग रचनेबाबतचा निर्णय काल घोषीत करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीला आता रंग भरत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबरच्या दरम्यान नगर पंचायत नगर पालिकाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शहरामध्ये भावी नगरसेवकांचा उत आला. काही कार्यकर्ते प्रमुख पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न करू लागले. केज नगर पंचायतही माजी खा.रजीनाताई पाटील यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता असली तरी आगामी निवडणूकीत कॉंग्रेस स्वत:च्या बळावर निवडणूक लढवणार की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोबत घेणार अशी आत्तापासून चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बजरंग सोनवणे हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. राज्यातील आघाडीचा प्रयोग केज शहरामध्ये राबवला जाणार का? याबाबतही विविध चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. जो तो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे म्हणून आत्तापासून प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांसह नेते कामाला लागले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


यांचीही राहणार महत्त्वाची भूमिका
केज शहरामध्ये जनविकास आघाडीचे हारूण इनामदार यांचाही चांगलाच दरारा आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने इनामदार हे येत्या निवडणूकीत कुठली भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. ते स्वत:ची आघाडी स्थापन करून निवडणूक लढवतात की एखाद्या पक्षाच्या माध्यमातून रिंगणात उतरतात हे अजून स्पष्ट झाले नाही. दुसरीकडे एमआयएमही चर्चेत आहे. एमआयएमचे काही कार्यकर्ते निवडणूकीच्या तयारीला लागलेले आहे. एकूणच निवडणूक चांगलीच रंगात येणार असल्याचे चित्र दिसून येवू लागले. केज शहरामध्ये गेल्या पाच वर्षात विकासाची कुठली कामे झाली? कुठल्या कामामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला? हे मुद्देही निवडणूकीमध्ये अनेक जण उपस्थित करणार असल्याचे बोलले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!