बीड (रिपोर्टर): धावत्या गाडीत एका विधवेवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली होती. तपासी अधिकारी अंतरप यांनी काल संध्याकाळी एका आरोपीला ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील अद्यापही दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
अमोल नामदेव लंबाटे (वय 34, रा. सात्रापोत्रा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी विधवा महिलेच्या प्रियकराचा सख्खा भाऊ असल्याचे सांगितले जाते. काल रात्री पिंक पथकप्रमुख एपीआय अंतरप यांनी सात्रापोत्रा येथून त्याच्या मुसक्या बांधल्या. आज त्याला न्यायालयात हजर करण्या तयेणार आहे.