असंघटीत कामगारांचा जिल्हा परिषदवर मोर्चा
मध्यान्ह भोजन योजना बंद करून खात्यावर पैसे टाका
बीड (रिपोर्टर): असंघटीक कामगारांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालयावर कामगारांनी मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले होते.
बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना बंद करून त्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात यावेत, बांधकाम कामगारांना बोनस द्यावा, पेन्शन देण्यात यावी, कामगारांची बोगस नोंदणी तपासून मेडिक्लेम योजना सुरू करावी, यासह इतर मागण्यांसाठी सेंटर ऑफ संडियन ट्रेड युनियन, बीड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो कामगारांचा सहभाग होता.