दिमाखदार सोहळ्यात ध्वजारोहण संपन्न
बीड जिल्हा कृषी व औद्योगिक संपन्न करु;
स्वातंत्र्य दिनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन
बीड(रिपोर्टर): बीड जिल्हा येत्या काळात कृषी क्षेत्रात संपन्न औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर ठरावा यासाठी आपण संकल्प करु या असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळयात संदेशाव्दारे नागरिकांना केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सी सांगता सोहळयात आज मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा श्री. मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या दिमाखदार सोहळयात ध्वजारोहणानंतर पोलिस बॅन्ड पथकाव्दारे वाजविण्यात आलेल्य राष्ट्रगीतावर सर्वानी
ध्वजाला सलामी दिली. यावेळी महाराष्ट्र गीत देखील सादर करण्यात आले. यावेळी आपल्य संदेशात ते म्हणाले की,स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आपण विविध उपक्रमांनी साजरे करीत आहोत. या लोकशाहीत प्राधान्य असलेल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत या स्वातंत्र्याचा व त्यानंतर लाभलेल्या विकासाच्या प्रक्रियेचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे राज्य सरकार कटीबध्द आहे.
नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार सरकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी शासन आपल्या दारी’ सारख्या मोहिमेतून लोकांची कामे गतीमान पध्दतीने शासन आता करत आहे.
विकासाची ही गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत लाभाच्या रुपाने पोहचली पाहिजे व जनसामान्यांना हे सरकार ’आपले सरकार’ वाटले पाहिजे याच भूमिकेतून मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी योजनांची आखणी केलेली आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी व इतरांना लाभ मिळवून द्यावेत अशा पध्दतीने कामकाज सुरु केले आहे. त्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.