Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकॉंग्रेस नेत्या रजनीताई पाटील आज नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार निवडीनंतर प्रथमच बीडमध्ये...

कॉंग्रेस नेत्या रजनीताई पाटील आज नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार निवडीनंतर प्रथमच बीडमध्ये दाखल


केज (रिपोर्टर)ः- कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रजनीताई पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहे. आज दुपारी त्या केज-अंबाजोगाई येथील नूकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात पडत असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

रजनीताई पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारी दाखल केली होती. मात्र भाजप उमेदवारांने उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर रजनीताई पाटील प्रथमच बीड जिल्ह्यात दाखल झाले आहे. बीड मध्ये आल्या आल्या त्यांनी बीड जिल्ह्यातील नूकसानग्रस्त भागाचा दौरा आयोजीत केला आहे. दुपारी दोन वाजता केज तालुक्यातील नायगांव, अडिच वाजता सौंदाणा, तिन वाजता अंबाजोगाई तालुक्यातील आपेगांव, कोपरा, अंजनपूर, देवळा, माखेगांव, सावळेश्‍वर पैठण, बोबडेवाडी या भागात जावून त्या पाहणी करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!