अवणी संस्थेचा सर्वे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी करणार प्रयत्न
बीड(रिपोर्टर): ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची कायम ओळख आहे. मात्र यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे होत आहे. शासन काखान्यावर साखर शाळा सुरू करतात, मात्र ऊस तोडणारे मजूर हे त्या शाळेपासून 15 ते 20 कि.मी. लांब असतात. त्यामुळे त्यांची मुले तिथे शिकवली जात नाहीत. कोल्हापूरच्या अवणी संस्थेने नऊ कारखान्यांवर केलेल्या सर्वेनुसार बीड जिल्ह्यातील 1900 शाळााबह्य मुले आढळून आले आहेत. हा सर्वे केवळ त्यांनी कारखाना परिसरात केला. प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी असणार असल्याचे अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी बीडमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
या पत्रकार परिेदेला अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले, महिला उद्योग कमगार संघटनेच्या मनिषा तोकले, छत्रपती राजर्षि शाहू महाराज प्रतिष्ठाणचे तत्वशील कांबळे उपस्थित होते. बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरीत होत आहेत. आपल्याच महाराष्ट्रात स्थलांतर होणार्या ऊसतोड मजुरांच्या पाल्याला शिक्षण मिळत नाही. तर महाराष्ट्राबाहेर जाणार्या ऊसतोड मजुरांच्या शिक्षणावर न बोललेलच बरं, कारण मराठी शाळा तिथे असण्याचा प्रश्नच नाही. कोल्हापुरात अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी नऊ कारखान्यांच्या परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत सर्वे केला. त्यांना तब्बल 1900 मुले हे शाळेबाहेर असल्याचे आढळून आले. त्यांनी प्रत्येक मुलाचे नाव, गाव, पत्ते घेऊन आज बीडमध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या 1900 मुलांना बीडमध्येच शिक्षण मिळावे, अशी मागणी केली. त्यासाठी बीहमध्ये सुरू असलेल्या संत भगवानबाबा वस्तीगृहात या विद्यार्थ्यांना प्रवेा मिळावा, अशी मागणी केली. बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रत्येकी दोन संत भगवानबाबा वस्तीगृह उभारण्यात आले आहेत. हे वस्तीगृह केवळ ऊसतोड मजुरांच्या मुलांचे वस्तीगृह आहेत. पाचवी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो तर पहिली ते चौथीपर्यंत प्रत्येक गावात हंगामी वस्तीगृह शासन सुरू करत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना येथेच शिक्षण मिळावे यासाठी महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या मनिषा तोकले, छत्रपती राजर्षि शाहू महाराज प्रतिष्ठाणचे तत्वशील कांबळे हे प्रयत्न करणार आहेत.