Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाळापुरीतून काळ्या बाजारात जाणारे धान्य नागरिकांनी पकडले

माळापुरीतून काळ्या बाजारात जाणारे धान्य नागरिकांनी पकडले


बीड (रिपोर्टर)- माळापुरी येथील राशन दुकानातील धान्य छोटा हत्तीमधून काळ्या बाजारात जात असल्याची माहिती काही नागरिकांना झाल्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली असता छोटा हत्ती वाहन चालकाने एका पेट्रोल पंपावर सर्व धान्य फेकून देऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी संबंधित नागरिकांनी पुरवठा विभागाला घटनेची कल्पना दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राशनचा काळा बाजार समोर आला आहे.

याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यात राशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड सातत्याने होत होती. माळापुरी येथील राशन दुकानातील धान्य छोटा हत्ती वाहनाद्वारे काळ्या बाजारात जात असल्याची माहिती काही नागरिकांना झाली. त्यांनी तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हे वाहन चालकाच्या लक्षात आल्यानंतर वाहन चालकाने नजीकच्या एका पेट्रोल पंपावर गाडीमधील सर्व धान्य उतरवले. हे सर्व धान्य पांढर्‍या गोण्यामध्ये आणण्यात आले होते. हे धान्य राशनचे असल्याचे सांगण्यात येते. याची माहिती नागरिकांनी पुरवठा विभागाला दिली आहे. मात्र अद्यापपर्यंत घटनास्थळी कोणीही आलं नसल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळाकडे नायब तहसीलदार यांची रवानगी झाल्याचे सांगण्यात येते.

Most Popular

error: Content is protected !!