निराधारांचे वाढीव मानधन वाटप करा
लालबावटाचा तहसीलवर मोर्चा
माजलगाव (रिपोर्टर)- महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लाल बावटा) च्या वतीने आज माजलगाव तहसील कार्यालय माजलगाव या ठिकाणी जूना मोंढा ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा नेण्यात आला या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अश्या की 1)निराधारांना शासनाने जाहीर केलेले 1500रू अनुदान तत्काळ वाटप करू असे प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले 2) बंद असलेल्या पगार तत्काळ अर्ज करा अम्ही त्या चालू करु असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले व काही मागण्या शासन स्थरावरच्या असल्यामुळे आम्ही तो निर्णय घेऊ शकत नाहीत आम्ही या मग्ण्यासंधर्भात शासणाकडे पथपूर्वठा करु असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या मोरच्यामध्ये राज्याचे नेतृत्व करणार्या कॉ सरिता खंदारे, कॉ मारोती खंदारे, कॉ बळीराम भुंबे, कॉ दत्ता काका डाके, कॉ रज्जाक सय्यद शेतमजुर जिल्हा सचिव कॉ शांतीलाल पटेकर माजलगाव तालुका अध्यक्ष कॉ रत्नाकर गोळेकर सचिव कॉ बंडूराम गरड यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी उपस्थीत माकप तालुका सचिव कॉ बाबा सर व माकपच्या सर्व जन संघटनेचे पदाधिकारी व निराधार उपस्थीत होते