Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशेकापचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या

शेकापचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या


बीड (रिपोर्टर)- अतिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत करण्यात यावी, एफआरपीचे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एकरकमी चौदा दिवसांच्या आत द्यावी, 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, बीड जिल्ह्यातील पाझर तलाव, नदीकाठच्या पुरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी भाई मोहन गुंड, नारायण गोले, संग्राम तुपे, अर्जुन सोनवणे, भीमराव कुटे, नाना पवार, जी.डी. देशमुख, नवनाथ जाधव, अमोल सावंत, प्रशांत चाटे, मुंजाबा पांचाळ, बलभीम भगत, गणेश कदम, सुदाम चव्हाण, विलास मुंडे, बालू इतापे, मुकुंद शिंदे, रईस शेख, मुकुंद खेत्री, अनंत चव्हाणसह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ी

Most Popular

error: Content is protected !!