आम्ही बंड केल्याचं सांगितलं जातं मात्र जनहितार्थ आम्ही सामुदायिक निर्णय घेतला. याला बंड म्हणता येणार नाही. माझ्याबद्दल कोल्हापूरच्या सभेत पवार साहेबांसमोर जितेंद्र आव्हाड यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. त्यांचे हे आरोप खेदजनक आहेत. त्यांच्या आरोपाला मीही उत्तर दिलं. आमच्या कोल्हापूरचं पायतान प्रसिद्ध आहे, असं म्हणून मी आव्हाडांच्या अवमानकारक भाषणाला उत्तर दिलं. त्यांचं भाषण योग्य नव्हतं. दादांनी राज्याच्या हितासाठी जो निर्णय घेतला त्याला आमचं समर्थन असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.