बीड (रिपोर्टर) केजच्या महावितरण कंपनीच्या विरोधात माजी सैनिक व महिलेने कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. वेळोवेळी मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी सैनिकावर उपोषण करण्याची वेळ आली आहे.
वीज वितरण कंपनी आपल्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने कंपनीच्या विरोधात माजी सैनिक व एका महिलेने कार्यालयाच्या समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. घरासमोरील विद्युत तार आहे तशीच ठेवावी त्यात बद करू नये या मागणीसाठी माजी सैनिक आजपासून उपोषणाला बसलेला आहे.