बीड (रिपोर्टर): खंडाळा येथील 65 वर्षीय वृद्धास नारायणगड या ठिकाणी मारहाण करण्यात आली. सदरील वयोवृद्ध मरण पावल्यानंतर त्याचा मृतदेह खंडाळा परिसरामध्ये टाकून देण्यात आला. मृतदेहाची शहानिशा झाल्यानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खंडाळा येथील जगन्नाथ भोंडवे यांना दोघांनी नारायणगड येथे नेले होते. त्याठिकाणीस त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भोंडवे हे मरण पावले. त्यांचा मृतदेह खंडाळा परिसरामध्ये टाकून देण्यात आला. मृतदेहाची शहानिशा झाल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.
पाटोद्याचे ठाणेप्रमुख मनीष पाटील, पीएसआय राहुल पतंगे, पो.कॉ. मिसाळ, मदन क्षीरसागर, सचीन कोळेकर, संतोष काकडे आदींनी हे प्रकरण उघडकीस आणले. मृतदेहाचे पीएम काल सायंकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. भोंडवे यांना सोबत घेऊन जाणार्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान नारायणगड येथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये मयत आणि आरोपी कैद असल्याचे दिसून येत आहे. मारहाण होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे.