Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमछेडछाडीला कंटाळून वडगाव गुंदा येथे मुलीने विषारी औषध प्राशन केले

छेडछाडीला कंटाळून वडगाव गुंदा येथे मुलीने विषारी औषध प्राशन केले

बीड (रिपोर्टर)- छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन केल्याची घटना गुंदावडगाव येथे घडली असून सदरील मुलीवर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
गुंदा वडगाव येथील नववी वर्गात शिक्षण घेणार्‍या एका मुलीची गावातीलच मुलगा छेडछाड करत होता. सततच्या या छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मुलीस उपचारार्थ बीड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मुलीचा जबाब घेण्यासाठी पिंपळनेरचे पोलीस दाखल झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!