बीड (रिपोर्टर): दिंद्रुड येथील ग्रामपंचायत सदस्य रामराव उबाळे यांनी मराठा आरक्षण देत नाही त्यामुळे मराठा समाजातील तरुणांची शिक्षणात आणि नोकरीत प्रगती होत नाही. राज्य सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
उबाळे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारला आंदोलने, उपोषणे करून जाग येत नाही. त्यामुळे मी गाव पातळीवर ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा त्यांनी काल सरपंच दिलीप कोमटवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्याची चर्चा परिसरात होत आहे.