Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहाशिबीरात उभारले ५० स्टॉल कायदेविषयक जनजागरण शिबीराचे दुपारी होणार उद्घाटन

महाशिबीरात उभारले ५० स्टॉल कायदेविषयक जनजागरण शिबीराचे दुपारी होणार उद्घाटन


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उदय ललित यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार
कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

बीड (रिपोर्टर):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येत असलेल्या पॅन इंडिया जनजागृती अभियान शिबीर बीड येथे आज आयोजित करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन दुपारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उदय ललित यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाकडे विविध प्रकारचे ५० स्टॉल उभारण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे व राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज कायदेविषयक जनजागरण महाशिबीराचे उद्घाटन होत आहे. याचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश उदय ललित यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला न्यायाधिश ए.एस.सय्यद (मुंबई), न्यायाधिश एस.एस.शिंदे, न्यायाधिशक श्रीमती कांकणवाडी, अशोक जैन, डी.पी.सुराणा, सुनिल केंद्रेकर, हेमंत महाजन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या स्थळी विविध प्रकारचे ५० स्टॉल उभारण्यात आलेलेे आहेत. कार्यक्रमाला दुपारनंतर सुरूवात होणार असल्याने सकाळपासूनच या ठिकाणी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!