जरांगेंनी वैद्यकीय तपासणी नाकारली, म्हणाले, मराठा आरक्षणाचा सलाईन द्या;
सराटे अंतरवलीत जरांगेंना भेटण्यासाठी मराठ्यांच्या रांगा
आरक्षणाबाबत
सरकारची सर्वपक्षीय
बैठक सुरू
भागवत जाधव । सराटे अंतरवली
मराठा आरक्षणासाठी सराटे अंतरवलीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस असून त्यांनी कालपासून औषध-पाण्याचा त्याग केला आहे. वैद्यकीय तपासणीला नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार व्हेंटीलेटरवर आले असल्याचे चित्र असून आज सरकारच्या वतीने याप्रश्नी सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मराठा आरक्षणाची सलाईन द्या, मी तात्काळ बरा होतो, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली तर त्यांना भेटण्यासाठी सराटे अंतरवलीत मराठा समाजातील महिला-पुरुषांच्या रांगाच रांगा पहावयास मिळत आहेत. आज महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सराटे अंतरवलीत डेरेदाखल झाल्या आहेत.
बीडमध्ये कुणबियांची अप्पर सचिवांकडून शोधाशोध
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील किती लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. किती लोकांच्या नोंदी सापडतात. जास्तीत जास्त किती लोकंाना कुणबी प्रमाणपत्र देता येतील या विषयासाठी राज्याच्या महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासोबत बैठक घेवून बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्राचा विषय मार्गी लावणार आहे.
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांचं मत काय?
मुख्यमंत्री शिंदेंनी बैठकीपूर्वी मांडली भूमिका
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांचे उपोषण आंदोलन अजूनही सुरू असून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरमयान टिकेल असे आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. (पान 7 वर)
इतर समाजाचं आरक्षण कमी न करता पूर्वी जसे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, तिचं भूमिका सरकारची आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला, तेव्हा आम्ही ज्यांची सिलेक्शन झालं होतं पण त्यांना नेमणूक मिळाली नव्हती अशा 3700 तरुणांना नोकर्या दिल्या. म्हणून सरकार सकारात्मक आहे. सगळ्या योजना, ओबीसींना मिळणारे सर्व लाभ आपण मराठा समाजाला देतोय, असे शिंदे म्हणाले. आरक्षण टिकणारं असलं पाहीजे, कायद्याच्या चौकटीत त्याला बाधा येऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. यासाठीच सर्वांना बैठकीला बोलवलं आहे. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी विरोधकांनी सूचना दिल्या पाहिजेत एवढीच आमची आपेक्षा आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
’आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार’;
मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार
वडीगोद्री (जि.जालना) : अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी पथक आल्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका (पान 7 वर)
जरांगे यांनी घेतली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत 14 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनासमवेत चर्चेच्या तीने फेर्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. रविवारी दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाहीत. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. मात्र जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक 10:40 वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवनी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला.