गेवराई (रिपोर्टर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा 14 वा दिवस असून या आंदोलनाला गेवराई तालुक्यातील गावागावात विविध लोकशाही पद्धतीने आंदोलन करत पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांचा लोंढा सराटी अंतरवलीत दाखल होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील बेलगुडवाडी व ताकडगाव येथील ग्रामस्थांनी भव्य मोटारसायकल रॅली काढून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. गेवराई तालुक्यात रोज वेगवेगळ्या गावागावात साखळी उपोषण, अन्नत्याग आंदोलन असे विविध लोकशाही मार्गाने लाक्षणिक आंदोलने होत आहेत. तर अनेक ठिकाणी गावागावातून मोटारसायकल भव्य रॅल्या काढून अंतरवलीत दाखल होत असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत.