बीड (रिपोर्टर) येळंबघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र बॅकेकडून शेतकर्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याने शेतकर्यांच्या वतीने आज बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. तर ओबीसीच्या आरक्षणासाठी ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
येळंबघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेकडून शेतकर्यांना दुय्यम वागणुक दिली जाते. तेथील कर्मचारी मनमानी कारभार करत असून बँकेने आपला कारभार सुधरावा या मागणीसाठी शेतकर्यांनी बँकेसमोर आंदोलन केले. यावेळी डॉ.गणेश ढवळे, अशोक काळकुटे, मा.पं.स सदस्य बी.एस कदम, ग्रां.पं सदस्य विकास आबा कदम, पत्रकार सुरेश पाटोळे, डॉ.अमर कदम, युवा उद्योजक नितीन ढाणे, ग्रां.पं सदस्य सेवानंद कदम, जम्मील शेख, प्रमोद कांबळे, राजेंद्र वाघ, मिस्कीन फौजी, सतीश कदम, पांडुरंग कदम, सुशिल कदम, अजय मुळे शेतकरी आदी उपस्थित होते. तर जिल्हा कचेरीसमोर ओबीसी बहुजन परिषदेच्यावतीने प्रा.सुशिला मोराळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन होते. यावेळी आदिंची उपस्थिती होती.