छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले आंदोलन
बीड (रिपोर्टर): राज्यातील सरकार कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. हा प्रकार अन्यायकारक असून कायमस्वरुपी नोकरभरती करण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तीव्र निदर्शने करत शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हे आंदोलन आ. संदीप क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
भाजप सरकार मनमानी पद्धतीने कारभार करत असून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही अन्यायकारक असून कायमस्वरुपी नोकरभरती करावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शासनाच्या जीआरची होळी करत निषेध केला. या वेळी के.के.वडमारे, कुंदन काळे, पंकज बाहेगव्हाणकर, दीपक हजारे, दादा हातागळे, सुशिल जाधव, निखिल सवाई, संकेत धुरंधरे, अमोल ठेंगरे, बंटी ससाणे, वल्लभ यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली.