Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिथं पोलिसांची गरज तिथं कमी कर्मचार्‍यांची नियुक्ती

जिथं पोलिसांची गरज तिथं कमी कर्मचार्‍यांची नियुक्ती


बीड (रिपोर्टर)- जिल्हा पोलीस दलाअंतर्गत गेल्या काही दिवसांपुर्वी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदलीत पेठ बीड, बीड शहर, शिवाजीनगर आणि बीड ग्रामीण या पोलीस ठाण्यांमध्ये जास्तीच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी असा अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी कमी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.

काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये किती अधिकारी आणि कर्मचारी असावेत, असा चार्ट तयार करण्यात आला होता. मात्र त्या चार्टनुसार अधिकारी, कर्मचार्‍यांची निणयुक्ती करण्यात आली नाही. पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये १५३ कर्मचारी असावेत, तर त्याऐवजी फक्त ३४ कर्मचार्‍यांचीच नियुक्ती झाली, बीड शहर ठाण्यात १४० कर्मचारी असावेत मात्र त्या ठिकाणी ३७ कर्मचार्‍यांचीच नियुक्ती करण्यात आली. शिवाजीनगर ठाण्याला १०८ कर्मचारी हवेत मात्र त्या ठिकाणीही ५८ कर्मचारीच नियुक्त केले गेले. बीड ग्रामीणला ५६ हवेत तेथेही २९ कर्मचार्‍यांचीच नियुक्ती करण्यात आली तर धारूर, शिरूर, केज, युसुफवडगाव, सिरसाळा यासह अन्य पोलिस ठाण्यांमध्ये कमी कर्मचारी असावेत, असा चार्टमध्ये उल्लेख असतानाही त्याठिकाणी जास्तीचे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. कर्मचारी कमी-जास्त निवड करण्यामागचा पोलीस प्रमुखांचा हेतु काय हे मात्र समजू शकले नाही. आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची नियुक्ती करायला हवी होती तशी ती नियुक्ती झाली नाही.

Most Popular

error: Content is protected !!