बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालय, दिल्लीच्या वतीने बीड जिल्ह्यातील दिव्यांगांची तपासणी करून शिबीरातील लाभार्थ्यांना सहाय्यक साधनांचे वाटप करण्यासाठी बीड शहरातील वैष्णव पॅलेस येथे आयोजित करण्यासाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले बीड शहरात आले असता शहर रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या उपस्थितीत माळीवेस, जुना मोंढा या ठिकाणी आठवले यांचा क्रेनद्वारे हार घालून व जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. जुना मोंढा व एमआयडीसी एरियात व्यापारी संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी राजू जोगदंड, मझहर खान, किसन तांगडे, महेश आठवले, विलास जोगदंड, अविनाश जोगदंड, किशोर कांडेकर, अशोक साळवे, अविनाश जावळे, महादेव उजगरे, सचीन कागदे, दीपक कांबळे, दशरथ सोनवणे, नरेंद्र जावळे, अरुण भालेराव, बापू पवार, गोवर्धन वाघमारे, भास्कर मस्के, रवी जोगदंड, मस्के, अरुण निकाळजे, मिलिंद तरकसे, दयानंद उजगरे, प्रभाकर चादंणे, गणेश वाघमारे, दीपक अरुण, बाळू गव्हाणे, भय्या मस्के, आप्पा मिसळे, शाम वीर, अक्षय कोकाटे, नामदेव वाघमारे, सुभाष तांगडे, सतीश उजगरे, धम्मा पारवेकर, मिलिंद पोटभरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.