Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमव्यावसायिकाचा कंकालेश्‍वर कुंडात मृतदेह सापडला

व्यावसायिकाचा कंकालेश्‍वर कुंडात मृतदेह सापडला

बीड (रिपोर्टर):- बीड शहरातील एका 45 वर्षीय प्रिंटींग प्रेसच्या व्यावसायिकाचा कंकालेश्‍वर कुंडामध्ये काल दुपारी मृतदेह सापडला. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा वसंतराव टेके रा.शुक्रवार पेठ बीड हे परवा घरातून बाहेर पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कोठेही आढळून आले नाही. त्यांचा मृतदेह कंकालेश्‍वर कुंडामध्ये आढळून आला. त्यांच्या या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख मैनू यांनी कुंडातून अनेक मृतदेह काढले
बीड शहरातील कंकालेश्‍वर कुुंडामध्ये आत्तापर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केल्यानंतर मृतदेह 1 ते 2 दिवस पाण्याच्या वर येत नाही. एखाद्याने आत्महत्या केल्यास त्याचा शोध घेण्यासाठी आधी कंकालेश्‍वर परिसरातच राहणारे शेख मैनू यांचा शोध घेतला जातो. शेख मैनू यांनी आत्तापर्यंत अनेकांचे मृतदेह कंकालेश्‍वराच्या कुंडातून बाहेर काढले आहे. ते पोहण्यात पटाईत असल्याने त्यांना या कुंडाचा चांगलाच अभ्यास आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल किंवा पेठ बीड पोलीस आधी त्यांच्याशी संपर्क करतात. नंतर शेख मैनू हे कुंडामध्ये मृतदेहाचा शोध घेवून ते मृतदेह बाहेर काढतात. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!