बीड (रिपोर्टर)- समग्र शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी ऋषीकेश शेळके यांच्याकडे प्रशासकीय व काही शिक्षकांची चौकशी करण्याची प्रकरणे सोपविण्यात आली होती, मात्र वारंवार सूचना देऊनही याबाबत चौकशी करून अहवाल न दिचल्यामुळे कारणा दाखवा किंवा खुलासा करा नसता आपणावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस शिक्षण विस्तार अधिकारी ऋषीकेश शेळके यांना बजावण्यात आली आहे.
शेळके यांच्याकडे पाटोदा येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार आहे. बीड जिल्हा परिषदेत ते विस्तार अधिकारी आहेत सोबतच समग्र शिक्षण विभागातही प्रमुख विस्तार अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. मात्र ते ज्या संस्था नव्याने 20 टक्के आणि 40 टक्के अनुदानास पात्र आहेत, अशाच कामाकडे ते लक्ष देतात व शिक्षण विभागाने प्रशासकीय बाबींची काही चौकशीची प्रकरणे सोपविली. त्यांचा अहवाल ते वेळेत शिक्षण विभागाा देत नाहीत, काही शिक्षक शाळेत जात नाहीत अशाही शिक्षकांची चौकशी करण्याची प्रकरणे शेळके यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहेत. मात्र त्यांचीही चौकशी करण्यात आलेली नाहीत. म्हणून शेळके यांना शिक्षण विभागाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल का दिला नाही, तात्काळ खुलासा सादर करा नसता आपणावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली आहे. आतापर्यंत अशा नोटीसा कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांनाच बजावण्यात येत होत्या मात्र विस्तार अधिकार्यांना नोटीस बजावल्यामुळे याची चर्चा शिक्षण विभागात होत आहे.