Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयुला आग,उपचार घेत असलेले रुग्ण भाजले; दहा जणांचा मृत्यू

नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयुला आग,उपचार घेत असलेले रुग्ण भाजले; दहा जणांचा मृत्यू

नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयुला आग
उपचार घेत असलेले रुग्ण भाजले; दहा जणांचा मृत्यू
नगर (रिपोर्टर)- जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आज सकाळी भीषण आग लागल्याने या आगीत उपचार घेत असलेले 20 पेक्षा अधिक रुग्ण होरपळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या आगीत आतापर्यंत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांची नावे किंवा जखमी रुग्णांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती आरोग्य विभाग अथवा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली नाही. या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळब उडाली आहे.

p3


    आज सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला अचानक आग लागली. धुराचे लोट रुग्णालय परिसरात दिसून आल्यानंतर एक धावपळ उडाली. घटनास्थळी हिवरे बाजारचे सरपंच पद्मभूषण पोपट पवार हेही लस घेण्यासाठी तिथे आलेले होते. आग लागल्याची घटना कळताच त्यांनी स्थानिक प्रशासनासह अन्य महत्वाच्या व्यक्तींना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यामुळे तातडीने घटनास्थळी अग्निशामक दल आले. या आयसीयूमध्ये 20 जणांवर उपचार सुरू होते. आगीमुळे आयसीयुमध्ये प्रचंड धांदल उडाली. यात अनेक जण भाजले गेले. तर काहींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचेही सांगण्यात येते. रुग्णालयामध्ये नर्स, वार्डबॉय, डॉक्टर यांनी धावपळ करत रुग्णांना आगीतून सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भीषण असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत या आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून याला अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आला नाही. या आगीत जखमी झालेल्यांची नावे आणि संख्या अद्याप देण्यात आलेली नाही.

Most Popular

error: Content is protected !!