बीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळपास 800 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही बँक प्रचंड डबघाईला आली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिक्षक पतसंस्था आणि इतर पतसंस्थांकडे सुमारे 650 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर शेतकरी वर्गाकडे दीडशे कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशी एकूण 800 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होत नसल्याने एकरकमी परतफेड योजना मध्यवर्ती बँकेत राबविण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती बँकेचे प्रशासक अविनाश पाठक यांनी दिली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिक्षकांच्या पतसंस्था कार्यरत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने या पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना गृहकर्ज व इतर कर्ज दिले आहेत. वारंवार कर्जवसुलीच्या नोटीसा देऊनही त्यांच्याकडून कर्जवसुली होत नाही. म्हणून व्याज माफ मुद्दल भरा, सोबतच शेतकरी वर्गाकडेही दीडशे कोटी रुपयांची थकबाकी आहे, या एकरकमी परतफेड योजनेमुळे काही रक्कम वसूल झाली तर मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा नव्याने पात्र शेतकर्यांना पीक कर्ज देता येईल म्हणून आजपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अविनाश पाठक यांनी दिली आहे.