बीड जिल्ह्याचे मुक्तीसंग्रामातील योगदान होणार आजरामर
बीड (रिपोर्टर)- मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीड जिल्ह्याचे योगदान अधोरेखित करण्यासारखे असून या सर्व संग्रामात डाव्या विचाराचे प्रमुख शिलेदार असलेले स्वातंत्र्यसेनानी तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे व त्यांच्या सर्व साथीदा-याचे योगदान अमूल्य असून ते कायमस्वरूपी स्मरणात रहावे व शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नावर संघर्ष करण्यासाठी ऊर्जा मिळावी या उद्देशाने त्यांचे भव्य स्मारक स्मारक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या जन्मभूमी मोहा येथे उभारण्यात आले असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बीड जिल्ह्यातील मुक्तीसंग्रामातील लढ्यात योगदान देणारे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे आणि त्यांच्या सहकार्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, यासाठी आज शहरातील विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉ. अजय बुरांडे, दत्ता डाके, कॉ. मोहन जाधव यांनी माध्यमाशी संवाद साधला. मराठवाडा – गोवा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह नामविस्ताराचा लढा लढणारे, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याग, तत्व, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने जीवन जगत ज्यांनी सत्तेच्या वाटेने जायचे नाकारून समाजातील सर्वहारा वर्गासाठी सर्वस्व अर्पण (पान 7 वर)
केले, शिक्षण आणि सामाजिक एकोप्याशिवाय समाजाची उन्नती नाही हे जाणून, मोहा सारख्या दुर्गम भागात महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि एक गाव एक पाणवठ्यातून समतेचा पाया घातला असे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे व त्यांच्या सहकार्यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. । ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या जन्मगावी मोहा ता. परळी येथे संपन्न होत आहे.
कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे आणि त्याच्या सहकारी यांच्या जीवनकार्याला अजरामर करणार्या स्मारकाचे भव्यदिव्य लोकार्पण माकप चे राष्ट्रीय महासचिव कॉ. सिताराम येचुरी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी किसान सभेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे, भाकपा (मा) पक्षाचे राज्य सचिव कॉ. डॉ. उदय नारकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या सिट् चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड हे असणार आहेत. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील बीड जिल्ह्याचे योगदान नव्या पिढीला समजावे यासाठी आणि उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या लढ्याला व चळवळीला नवी ऊर्जा देण्याचे काम हे स्मारक करेल. या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माकप राज्य कमिटी सदस्य, कॉ. पी. एस. घाडगे माकप बीड जिल्हा सचिव अॅड. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके कॉ. मोहन जाधव यांच्या सह सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.