सरकारच्या विरोधात घोषणा, आरक्षण बचाव, खाजगीकरण हटाव, विध्यार्थी, महिलांची लक्षणीय उपस्थिती
परळी (रिपोर्टर)- देशात केंद्र ते राज्यात सध्या अस्थिरता निर्माण करण्याचे काम हे सरकार करत असून समाजा समाजात द्वेष पेरण्याचं डरपव करत असून फक्त घोषणा बाजी करून झुमला सरकार असल्याचे दिसून येत आहे आताच्या आदेशामध्ये संस्था, शाळा ,आशा पावित्र्य ठिकाणी तर खाजगीकरण करण्याचे आदेश काढण्यात आले आहे मात्र सर्व ठिकाणी हे हे जातीवादी सरकार खाजगीकरण करण्याच्या मनीषा व्यक्त करून दाखवत आहे त्याच निषेधार्थ परळी तालुक्यातील बौद्धजण समिती सामाजिक स्थरावर काम करत असते या मध्ये सर्व पक्षीय लोकांचा सहभाग असतो ही समिती फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात काही प्रश्न अडचणी सोडवण्याचे काम करते याच बौद्धजन समितीच्या वतीने परळीत सरकारच्या खाजगीकरण आरक्षण बचावासाठी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने बहुजन समाज उपस्थित होता या मध्ये लक्षणीय संख्या ही विध्यार्थी आणि महिलांची संख्या मोठी दिसून आली या मोर्च्यांत सर्व राजकीय पक्ष बाजूला सारून फक्त सामाजिक एकता दिसून अली आहे सर्व परळी तालुक्यातील आलेल्या बहुजन बंधवाचा बौद्ध जण संघर्ष समितिच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले या सरकारच्या खाजगीकरण निषेधार्थ मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार रुपनार यांना महिला आणि विध्यार्थी यांच्या हस्ते देण्यात आले या निवेदना द्वारे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना देणायत आले आहे सर्व बांधव , महिला, समता दैनिक दल, वकील, व्यापारी सहभागी झाल्या बद्दल सर्वांचे बौद्धजण संघर्ष समितीच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.