बीड (रिपोर्टर)- बीड पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागाकडून काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट उलटून गेल्यानंतरही गणवेशाचा निधी मिळत नव्हता. शेवटी 20 तारखेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 25 तारखेपर्यंत शालेय समितीच्या खात्यावर निधी वर्ग झाला नाही तर आपणावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावल्यावर आज बीड तालुक्यातील शालेय समितीच्या खात्यावर 52 लाखांचा निधी जमा होत आहे.
बीड जिल्ह्यातील 11 पैकी 10 तालुक्यात शालेय समितीच्या खात्यावर निधी वर्ग झाला होता. मात्र बीड पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळेच स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट उलटून गेला तरी शालेय समितीच्या खात्यावर निधी न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. सीईओंनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला नोटीस बजावल्यानंतर आज अखेर या तालुक्यातील शालेय समितीच्या खात्यावर 52 लाखांचा निधी वर्ग करण्यात येत आहे.